Share

“मोदींनी अनेक जागतिक नेत्यांना पिछाडीवर टाकले”, चंद्रकांत पाटलांकडून स्तुतिसुमने

Published On: 

मुंबई: मॉर्निंग कन्सल्ट (Morning Consult) या कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) लोकांची मान्यता असलेल्या नेत्यांमध्ये जगात पहिल्या क्रमांकाचे नेते ठरले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत दिली आहे. यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही (Chandrakant Patil) ट्वीट करत मोदींचे कौतुक केले आहे.

भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या विकास कार्यांच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मोदी जी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले असून त्यांनी अनेक जागतिक नेत्यांना पिछाडीवर टाकले आहे. अभिनंदन मोदी जी!”, असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

दरम्यान नारायण राणे यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “खरंच हा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील लोकमान्यता असलेल्या नेत्यांमध्ये तब्बल ७७% रेटिंग मिळालं आहे. यामुळे ते पुन्हा एकदा ते सध्याच्या काळातील जगातील सर्वात मोठे नेते ठरले आहेत. हे रेटिंग जून २०२१ मधील ६६% टक्क्यांवरून नोव्हेंबर २०२१ मध्ये ७७ टक्क्यांवर गेलं आणि त्यानंतर आता ७७% वर आहे. यामुळे ही अभूतपूर्व वाढ आहे.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!