मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर बीसीसीआयने इंग्लंडदौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यात भारताने वेगवान ताफ्यात बुमराह, शमी, इशांत, उमेश यादव यांच्या साथीने नवोदीत मोहम्मद सिराजला संघात स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चांगल्या कामगीरीमुळे त्याच्याकडून भारतीय क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
संघ निवड झाल्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक आठवण सांगितली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान जेव्हा सिराजच्या वडिलांच्या निधनाची बातमी त्याला समजली होती. त्यावेळी तो त्याच्या रुममध्ये एकटाच रडत बसला होता. यावेळी विराट कोहली त्याच्या रुममध्ये गेला आणि त्याला धिर देत मिठी मारली. आणि म्हणाला सगंळ ठिक होईल आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत काळजी करु नको. असे म्हणाला.
यावेळी पुढे बोलताना सिराज म्हणाला की,’मी आज जे काही आहे ते विराट भय्यामुळे आहे. विराटने मला खुप संभाळले आहे. आयपीएलमध्ये २ वर्षे खराब कामगीरी करुनही त्याने मला संघात कायम ठेवले. त्याच्या विश्वासामुळेच मी चांगली कामगीरी करु शकलो.’ असे सिराज म्हणला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिराजने ३ कसोटी सामन्यात १३ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- शांत स्वभावाचा हनुमा विहारी भडकला, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर
- एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यीची ही दुसरी वेळ, २३ वर्षानंतर आला पुन्हा योग
- विनाकारण फिरणाऱ्या १११ नागरिकांपैकी ६ निघाले ‘कोरोना स्प्रेडर’!
- नव्या संसद भवनाचे काम थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिक दाखल
- अशोक चव्हाण करणार देशभरातील विधानसभा निवडणूक निकालांची समीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

