🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या संसर्गाने आयपीएल स्पर्धेत शिरकाव केल्याने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात अनेक क्रिकेटपटु पुढे येत वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे.
आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज हनुमा विहारीने दुखापतीनंतर या दौऱ्यात पुनरागमन केले आहे. यादरम्यान हनुमा विहारी हा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. यादरम्यान विहारी सोशल मीडीयाच्या माध्यामातून रुग्णांना अवश्यक ती गरज पुर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. यादरम्यान एका युझरने हनुमाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र शांत हनुमाने त्याची अशी फिरकी घेतली की त्या युझरने ट्विट डीलिट करत धुम ठोकली.
I would if you’re suffering like many people in India are right now. Oh, wait a minute you’re actually suffering from a different disease. I’m sorry! ???? https://t.co/rLaOQDa7v3
— Hanuma vihari (@Hanumavihari) May 9, 2021
विहारीने केलेल्या एका ट्विटखाली त्या युझरने रिप्लाय देत लिहिले की, ‘ठीक आहे. दोन मसाला डोसा घेऊन ये आणि सोबत, नारळाची चटणी देखील.’ या खोचक ट्विटवर विहारीने तात्काळ प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘मी नक्की दिले असते मात्र तू भारतातील इतर लोकांप्रमाणे आजारी होत आहेस. तुला जरा वेगळाच संसर्ग झाला आहे. मला माफ कर.’ असे उत्तर दिले. या उत्तरानंतर त्या युझरने त्याचे ते ट्विट डीलीट केले. मात्र तो पर्यंत अनेक युझर्सने या ट्विटचे स्क्रीनशॉट घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- एकाच वेळी भारताचे दोन संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यीची ही दुसरी वेळ, २३ वर्षानंतर आला पुन्हा योग
- विनाकारण फिरणाऱ्या १११ नागरिकांपैकी ६ निघाले ‘कोरोना स्प्रेडर’!
- नव्या संसद भवनाचे काम थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिक दाखल
- अशोक चव्हाण करणार देशभरातील विधानसभा निवडणूक निकालांची समीक्षा
- ‘सहा-आठ महिने भरपूर शिव्या दिलेल्या राज्यपालांना नम्रपणे भेटायला जाणे म्हणजे…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

