तुळजापूर – हे संकट संपूर्ण शेती अर्थव्यवस्था उध्वस्त करणारं आहे. त्यामुळे तातडीची मदत कशी देता येईल… खरवडून गेलेली जमीन कशी सावरता येईल आणि नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत कशी होईल ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो आहोत. या संकटावर… आलेल्या अडचणींवर एकजुटीने मात करु. सध्या दिवस वाईट आहेत… अडचणीचे आहेत परंतु धीर सोडायचा नाही… यावर मात करु… सरकार तुमचं आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मराठवाडयातील अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिला.
लातूर जिल्हयातील राजेगाव येथे शरद पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.काल सकाळपासून शरद पवार यांनी पाहणी सुरू केली. यावेळी प्रत्येक शेतकरी आपली व्यथा त्यांच्याशी मांडत आहे. त्यावेळी शरद पवार धीर सोडू नका आम्ही आहोत असा शब्द शेतकऱ्यांना देत आहेत.दुष्काळ आल्यावर पीकंच नष्ट होतात परंतु या संकटात जमीनच खरवडून गेली आहे. जमीनीचे स्वरूपच बदलले आहे त्यामुळे हे जास्त नुकसान आहे असे शरद पवार म्हणाले.
काल दुपारी राजेगाव येथे शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना लातूर जिल्हयातील किल्लारी आणि परिसरात झालेल्या भूकंपाची आठवण सांगितली. त्याठिकाणी पहाटे पोचुन लोकांना धीर दिला होता. संकटग्रस्त माणसांना उभं केलं होतं. आज तसंच संकट उभं ठाकल्याचं शरद पवार म्हणाले.
या संकटावर मार्ग काढावा लागेल. यासाठी राज्य व केंद्र सरकारशी बोलू. नुकसानीचे स्वरूप पहाता एकंदरीत राज्य सरकारची या सगळ्याला तोंड देण्याची परिस्थिती नाहीय मात्र यासाठी केंद्राची मदत मिळणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि देशातील प्रमुख लोकांशी बोलून तातडीची मदत कशी देता येईल असा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या-
- बेरोजगारांच्या हाताला काम देण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक, राफेलच्या चर्चा घडवल्या जातात : शिवसेना
- मंदिरे उघडा म्हणून बोंब ठोकणाऱ्या भाजपाला भगिनींकरिता लोकल चालू होईल याची तमा नाही का?
- आमच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळेच सरकारची जिम उघडण्याची तयारी -भाजयुमो
- ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आले आहे’
- कोरोनाविरोधातील लढ्यासाठी केंद्राने आतापर्यंत राज्यांना 1352 कोटी रुपये केले जारी


