Share

‘विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा’, यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांना टोला

Published On: 

अमरावती : त्रिपुराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले होते. अनेकांच्या घरांसह दुकानं, वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराची झालेल्या भागाची पाहणी केली. यावर काँग्रेसनेत्या अॅड. यशोमती ठाकूर (Ad. Yashomati Thakur) यांनी टीका केली आहे.

यशोमती ठाकूर याबाबत ट्विट करत म्हणाल्या, अमरावती तणावासंदर्भात दोन्हीकडच्या लोकांवर कारवाई होत आहे. अर्धवट माहितीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगायला हवा. आपल्याकडून शांततेचं आवाहन अपेक्षित असताना, वातावरण भडकवण्याचाच प्रयत्न दिसत आहे.

१२ तारखेची घटना चुकीची होतीच त्यांचं कोणीच समर्थन केलेले नाही. तसंच १३ तारखेची घटना चुकीची होती, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही मान्य केलेले आहे, या परिस्थितीत शासन योग्य कारवाई करत आहे. महाराष्ट्रात शांतता राहावी म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय. राज्यभरात एकाच दिवशी, १२ नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित होते असा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा १२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती, असेही फडणवीस यांनी म्हटले. सरकारने रझा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!