मुंबई : तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर विधानसभा अध्यक्षपद हे रिक्त असून मागील अधिवेशनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीच अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. आता पावसाळी अधिवेशन अवघ्या काही दिवसांवर आलं असून पुन्हा एकदा अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
संविधानिक बाबीनुसार अध्यक्षपदाची निवड तात्काळ करणे गरजेचे असते, मात्र या सरकारने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून अध्यक्षपद अद्यापही रिक्त ठेवल्याची टीका भाजपने केली होती. तर, या पावसाळी अधिवेशनातच अध्यक्षांची निवड केली जाईल असं महाविकास आघाडीतील काही नेते बोलत आहेत. अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीमध्ये काही काळ तणाव निर्माण झाल्याचं याआधी पाहायला मिळालं होतं. त्यामुळेच महाविकास आघडी सावध भूमिका घेत असल्याच दिसून येत आहे.
दरम्यान, अध्यक्षांची निवड ही या अधिवेशनातच होणार असल्याचं काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तसेच, विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असेल असं देखील त्यांनी आवर्जून नमूद केलंय. ‘विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. हे सरकार भक्कम आहे. दोन वर्षे सरकार चाललं आहे, पुढच्या काळातही सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत,’ अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
- ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोला!’, आव्हाडांनी सांगितला उपाय
- ‘शोषित-वंचित घटकांचा प्रतिनिधी म्हणवणाऱ्या पडळकरांकडे ५० लाखांची गाडी कशी?’
- ‘चपटी लावलेली असली की लोक हत्तीलाही मुंगी समजतात’, आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

