Share

अश्विन संपूर्ण साीरिजमधून बाहेर; विराटचं सूचक वक्तव्य

Published On: 

इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 4 ऑगस्ट रोजी नॉटिंघममध्ये सुरू झाला. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बरीच चर्चा झाली आणि जेव्हा त्याची घोषणा झाली तेव्हा अनेक दिग्गजांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. टीम इंडियात रवीचंद्रन अश्विनच्या जागी रविंद्र जडेजाला संधी मिळाली. अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला पहिल्या सामन्यात संधी न दिल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेतला.

त्यानंतर अनेकांनी विराटच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत टीका केली. सर्वत्र विराटवर टीका होत झाली. अश्विनला केवळ पहिली टेस्ट नाही तर संपूर्ण साीरिजमध्ये संधी मिळणार नाही, असं सूचक वक्तव्य टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं केलं आहे. कोहलीनं पहिल्या टेस्टमध्ये निवडलेली टीम ही या सीरिजमध्ये आमची योग्य टीम आहे, असं वक्तव्य विराटनं केलं आहे.

विराटच्या या निर्णयावर भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी नाराजी व्यक्त करत म्हणाले होते की, ‘मी नेहमीच विश्वास ठेवतो की रविचंद्रन अश्विन हा एक अतिशय प्रतिभावान गोलंदाज आहे. अलिकडच्या परदेश दौऱ्यात त्याने केलेली कामगिरी आश्चर्यकारक आहे. जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच हरवले. या मालिकेत टीम इंडियासमोर त्याचा आत्मविश्वास दिसून येतो. पुढे ते म्हणाले, अश्विनसाठी मला अजूनही वाईट वाटते. तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, तुम्ही त्याला प्लेइंग इलेव्हनपासून दूर ठेवू शकत नाही.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!