नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात आज (27 ऑक्टोबर) सुनावणी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतरची ही पहिलीच सुनावणी आहे. विशेष म्हणजे ज्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सप्टेंबर महिन्यात स्थगिती दिली होती त्याच खंडपीठापुढे ही सुनावणी होत आहे. दरम्यान, मराठा आरक्षण सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली.
तर बेंचने हा विषय घटनापीठाकडे दिला त्यामुळे ही सुनावणी घटनापीठाकडे व्हावी अशी आमची मागणी आहे. काही लोक विनाकारण राजकारण करत आहेत, ज्यांना सरकारवर विश्वास नाही त्यांनी स्वतःचा वकील लावावा अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
दुसरीकडे स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या खंडपीठात यावर सुनावणी होत आहे.
न्यायमूर्ती एल.एन.राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणावर सुनावणी होत आहे. यावेळी सरकारकडून वकील मुकूल रोहतगी, अभिषेक मनू सिंगवी, कपिल सिब्बल बाजू मांडतील. तर विनोद पाटील यांच्या वतीने वकील संदीप देशमुख बाजू मांडतील. तर राज्य सरकारकडून वकिल पी एस पटवलीया बाजू मांडणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- खासदार सुजय विखेंच्या प्रयत्नातून नगर-मनमाड महामार्गासाठी साडेचारशे कोटींचा निधी!
- नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले शेतकऱ्यांच्या बांधावर!
- अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात
- अनिल कपूर आणि नीतू सिंग कपूर यांची जोडी पहिल्यांदाच सोबत काम करताना दिसणार
- ‘मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील’


