मुंबई : ‘गुड न्युज’ दिग्दर्शक राज मेहता पुन्हा एकदा असाच एक सिनेमा बनवणार आहेत. ‘गुड न्युज’ नंतर आता राज मेहता ‘जुग जुग जियो’ या सिनेमावरती काम करत आहेत. या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत वरून धवन आणि कियारा आडवाणी असणार आहेत. या सिनेमाची शूटिंग चंडीगढ़ मध्ये होणार आहे.
याचदरम्यान आता ‘जुग जुग जियो’ या सिनेमामध्ये वरून धवन व कियारा सोबत यंग लीड कपल नीतू कपूर आणि अनिल कपूर देखील असणार आहेत. या चित्रपटामध्ये अनिल कपूर आणि नीतू कपूर एका कपलची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
पहिल्यांदाच नीतू आणि अनिल कपूर सोबत काम करताना दिसणार. बॉलीवूड मध्ये इतके वर्ष काम करूनही नितू कपूर आणि अनिल कपूर यांनी सोबत काम केले नाही. नितू आणि अनिल कपूर पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत.
नीतू सिंग कपूर आणि पती ऋषी कपूर व मुलगा रणबीर कपूर यांच्यासह २०१७ सालच्या ‘बेशरम’ चित्रपटात काम केले होते. नीतू इतक्या लवकर परत चित्रपट करण्यास तयार न्हवते, खासकरुन ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर. पण करण जोहरने त्यांना हा चित्रपट करण्यासाठी मनवले आणि या मजेदार चित्रपटाचा भाग बनविले.
अनिल आणि नीतूचे अनेक मजेदार सीन ‘जुग जुग जिओ’मध्ये दिसतील. वरुण आणि कियाराला एकत्र पाहण्याव्यतिरिक्त अनिल आणि नीतू यांना एकत्र पाहून चाहते उत्साही आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
- लग्न संस्थेवर विश्वास नाही, लग्नासाठी सीमा असू नयेत – राधिका आपटे
- पोलंड मधील व्रोकला शहरात आता ‘हरिवंश राय बच्चन’ चौक !
- एलआयसीची प्रारंभिक भाग विक्री पुढील आर्थिक वर्षात
- ‘माझी प्रकृती उत्तम आहे,थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन’
- पुणेकरांसाठी खुशखबर ! १ नोव्हेंबरपासून खुली होणार शहरातील उद्याने !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

