Share

‘मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील’

Published On: 

मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविजयी मेळावा कार्यक्रमातील भाषण हे निराशाजनक आणि मुख्यमंत्रीपदाच्या प्रतिष्ठेला न शोभणारे होते होते. सत्तेसाठी हिंदुत्वाशी बेईमानी करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचे नाव घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी सोमवारी केली .

राणे म्हणाले की, माझ्या आयुष्यात मी आत्तापर्यंत जे – जे मुख्यमंत्री पाहिले त्यांनी स्वत:च्या भाषाशैलीने, कार्याने, कामाने स्वत:ची प्रतिष्ठा राखली. मात्र याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद ठरले. ठाकरे हे वर्षभरापासून राज्याचा कारभार सांभाळत आहेत. मात्र, वर्षभरानंतरही भाषणात काय बोलावे यांचे त्यांना भान नाही. शेतकरी, शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था या सर्व प्रश्नांना बगल देऊन ते काहीही बरळत होते, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

दरम्यान, नारायण राणे यांनी काल  मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल औरंगाबाद येथे दिली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकासानीची पाहणी करण्यासाठी अशोक चव्हाण औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला आहे.

‘माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयात मला काही बोलायचे नाही. पण त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. त्यांची किंमत काय आहे. विषय शिवसेनेचा आहे. शिवसैनिकच योग्यवेळी त्यांना उत्तर देतील कारण ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक आहेत’, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!