Nitesh Rane । मुंबई : आज शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलेला पहिला भाग प्रदर्शित झाला. या मुलाखतीवर राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. यानंतर आता राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलं येत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. ते यावेळी दिल्लीत बोलत होते.
नारायण राणे म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना मराठी माणूस, हिंदुत्व शिवसैनिक यांची आता आठवण येत आहे. अडीच वर्षात त्यांना हिंदुत्व आणि मराठी अस्मिता आठवली नाही. सत्ता गेल्यावर तडफडत आहेत, म्हणून त्यांनी व्यथा मांडली. ते व्याकूळ झालेत मुख्यमंत्रीपद गेले. उद्धव ठाकरे या व्यक्तीला मी जवळून ओळखतो. अंगात खोटारडेपणा, कपटीपणा आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसवून अडीच वर्षात ना जनतेचे ना शिवसैनिकांचे ना हिंदुत्वाचे भले झाले, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
दरम्यान, राणेंचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तुम्ही त्या वेळेला गुंगीत होता तर मग तुमचा मुलगा दावोसमध्ये काय धिंगाणा घालत होता? मग गुंगीत असताना तुम्ही मुलाला प्रश्न विचारू शकत नाहीत तर अन्य लोकांना विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी केलाय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्ष म्हणून स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीयेत त्यामुळेच त्यांना अशा प्रकारे अंधारात पत्रकार परिषदा घ्याव्या लागतायत, असा टोला देखील नितेश राणेंनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Jaiswal : शिंदे-फडणवीसांची जोडी तेंडुलकर-कांबळी यांच्यासारखी; आशीष जैस्वालांचे वक्तव्य!
- Pravin darekar | बाळासाहेब कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही – प्रविण दरेकर
- Jayant Patil | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त, राज्याला… – जयंत पाटील
- Nitesh Rane : तुम्ही गुंगीत होता, मग मुलगा दावोसमध्ये काय धिंगाणा घालत होता? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल!
- Prasad Lad | आजची मुलाखत म्हणजे बॅट पण माझी, बॉल पण माझा,अंपायर पण माझा ! – प्रसाद लाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

