Share

महाकाल एक्स्प्रेसमध्ये शंकरासाठी सीट राखीव, ओवेसींनी केली संविधानाची प्रस्तावना ट्वीट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वाराणसीहून इंदोरसाठी रविवारपासून काशी महाकाल एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. या ट्रेनमध्ये भगवान शंकरासाठी एक सीट कायमची आरक्षित ठेवण्यात आली असून त्या जागेला देव्हाऱ्यासारखे रुप देण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. ज्या डब्यात हे मंदिर बनवले आहे, त्याचे फोटोही समोर आले आहे.

‘महादेवासाठी सीट रिकामी आणि आरक्षित ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सीटवर एक मंदिरही बनवण्यात आले आहे, जेणेकरुन ही सीट मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकालसाठी राखीव आहे, हे प्रवाशांना समजेल,’ असे दीपक कुमार म्हणाले. तसेच ही सीट कायमची भगवान शंकरासाठी आरक्षित ठेवण्याचा विचार सुरु असल्याचे दीपक कुमार यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील वाराणसी ते मध्य प्रदेशच्या इंदूरपर्यंत या ट्रेनचा मार्ग असेल. ही रेल्वे इंदूरजवळ ओंकारेश्वर, उज्जैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ या तीन ज्योतिर्लिंगांना जोडणार आहे. भगवान शंकरासाठी B-5 या डब्यात 64 क्रमांकाचे आसन राखीव ठेवण्यात आले आहे, असे उत्तर रेल्वेचे प्रवक्ते दीपक कुमार यांनी सांगितले. विशेष म्हणजे महादेवासाठी सीट राखीव ठेवल्यानंतर ट्रेनमध्ये ‘भोले बाबा’साठी एक सीट कायमची आरक्षित ठेवण्याबाबत रेल्वे प्रशासन विचार करत आहे.

वाराणसी ते इंदूर दरम्यान आठवड्यात तीन वेळा धावणाऱ्या या ट्रेनमध्ये भक्तिगीते वाजत राहतील. तसेच प्रत्येक डब्यात दोन खासगी सुरक्षारक्षक असतील. शिवाय प्रत्येक डब्यात सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. तसंच प्रवाशांना शाकाहारी जेवण दिले जाईल. ही ट्रेन 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

दरम्यान भगवान शिवसाठी एक सीट आरक्षित ठेवल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ओवेसी यांनी ट्विटरवर संविधानाच्या प्रस्तावनेचा फोटो पोस्ट करुन पंतप्रधान कार्यलयाला मेंशन करत, काशी महाकाल एक्स्प्रेसमधील महादेवाच्या सीटचं वृत्त रिट्वीट केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!