Share

नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला मुख्यंमत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार ; काय आहे कारण

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे शहरातील विविध विकासकामांचे उदघाटन करायला देशाचे प्रधानमंत्री ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. प्रोटोकॉल नुसार देशाचे प्रधानमंत्री ज्या राज्यात दौऱ्याला जातात,  त्या राज्याचे मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांच्या स्वागताला उपस्थित राहतात. मात्र नरेंद्र मोदी यांच्या या पुणे दौऱ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असणार नाहीत. राज्य सरकारच्या वतीने अजित पवार आणि सुभाष देसाई हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना लांबचा प्रवास करण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या  विधानसभा आणि विधानपरिषदेच्या अधिवेशनातही उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले होते.

दरम्यान महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये.

महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!