Share

परिवहन मंत्री असतांना नेहमी म्हणायचे, तुमच्या वाहनाने प्रवास करतो; चंद्रकांत खैरेंनी जागवल्या आठवणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल औरंगाबादचे माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देशमुख यांच्या आठवणी जागवल्या आहेत.

या संदर्भात चंद्रकांत खैरे म्हणाले की, ‘शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे तब्बल ११ वेळा (५४वर्ष) प्रतिनिधीत्व केलेले, आदर्श लोकप्रतिनिधी, साधे सरळ व्यक्तीमत्व, गणपतराव (आबा) देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली! एक पक्ष, एक नेता, एक मतदारसंघ म्हणून त्यांची कारकीर्द जगभरात ओळखली जाईल. १९९१ -९५ ते १९९५-९९ अशी दहा वर्षे त्यांच्या समवेत काम करता आले. बस प्रवास हा आबाचा आवडता प्रवास होता, परिवहन मंत्री असतांना आबा नेहमी म्हणायचे तुमच्या वाहनाने प्रवास करतो.’

आदर्श आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांच्या कार्याकडे पाहिले जाते. सर्वसामान्यांचा आमदार अशीच त्यांची ओळख होती. राजकीय क्षेत्रात त्यांना ‘आबा’ या नावानेच हाक मारली जाई. आमदार असून देखील त्यांनी अनेकदा एसटी महामंडळाच्या वाहनानेच प्रवास केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!