Share

चाहत्यांनी ट्रोल करताच गांगुलीने ‘ते’ ट्विट हटवले

Published On: 

मुंबई : आगामी टी-२० विश्वचषक आणि आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत सामन्याच्या आयोजनासाठी बीसीसीआयचे एक पथक सध्या दुबई येथे आहे. काही दिवसापुर्वी बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने हे युएई मध्ये खेळवणार असल्याची घोषणा केली. या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात कायदेशीर बाबी पुर्ण करण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीसह अनेक अधीकारी दुबईतच आहे.

यादरम्यान सौरव गांगुलीने काही दिवसापुर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत त्यांनी रेसींग कार चालणार असल्याचे सांगितले होते. तसेच कॅप्शन देताना ‘आज कार रेसींग केल्याने वेगळीच उर्जा उत्पन्न झाली असे वाटत आहे.’ असे कॅप्शन दिले. या पोस्टवर गांगुलीच्या चाहत्यांनी सल्ले द्यायला सुरु करत ट्रोल केले. एका चाहत्याने दादाला ‘या सर्व गोष्टीपासुन दुर राहा, स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या ‘ असा सल्ला दिला.

चाहत्यानी दिलेल्या अशा सल्ल्यामुळे सौरव गागुंलीने ही पोस्ट हटवली. सौरव गागुंली यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना ह्रदयविकाराचा त्रास जाणवत होता. त्यामुळे चाहत्यांनी काळजीपोटी असा सल्ला दादाला दिला. चाहत्यांच्या या सल्ल्यावरुन आजही दादाचे चाहते त्यांची किती काळजी करतात हे स्पष्ट होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!