🕒 1 min read
बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सर्वांना जपायची आहे. श्वासात श्वास असेपर्यंत दसऱ्याला भगवान भक्तीगडावर नतमस्तक होण्यासाठी मी येणार आहे, तुम्हीही येणार ना? अशी साद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी रविवारी संत भगवान बाबांच्या जन्मस्थळी सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे घातली. दरवर्षी दसरा मेळाव्याला देशभरातून एका रात्रीत लाखो लोक जमा होतात, मागील वर्षी कोरोनामुळे ऑनलाईन मेळावा घेतला. ही परपंरा अखंड ठेवण्यासाठी यंदा मी नतमस्तक होण्यासाठी येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे या रविवारी दुपारी संत भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव घाट येथे आल्या होत्या. गावात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी संत भगवान बाबांचे दर्शन घेतले. याठिकाणी उभारलेल्या भव्य स्मारकाला भेट देताना स्वतः पाण्यात उतरून मुर्तीचे दर्शन घेतले तसेच मेळावा मैदानाची पाहणी केली.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, दसरा हा स्वाभिमानाचा दिवस आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम दरवर्षी यादिवशी इथे होत असतो. थकत नाही आणि रूकत नाही, असा वारसा तुमच्यामुळे मला मिळाला आहे, तुमच्या जिवावरच मी लढू शकते, संघर्ष करू शकते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मध्यंतरी पाणी टंचाईमुळे मंदिर व सुशोभीकरणाचे काम करता आले नाही. परंतु, हे सर्व कामे पूर्ण करून सुंदर मंदिराचे काम देखील पूर्ण करू, असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी पंकजा मुंडे यांनी श्री क्षेत्र भगवान भक्ती गड परिसरात असलेल्या विविध कामांची पाहणी केली. तसेच ही सर्व कामे पूर्णत्वाकडे नेण्याच्या अनुषंगाने संबंधितांना सूचना दिल्या. ग्रामस्थांच्या साथीने हे अनोखे स्मारक भक्ती शक्तीचे वैभव ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
