मुंबई: तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta Ka Ulta Chashma TMKUC) हा टीव्ही शो गेले अनेक वर्ष चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. संपूर्ण देशभरात या शोचे चाहते आहे. पण या शो मधील लोकप्रिय कलाकार दिवसेंदिवस शो सोडताना दिसत आहे. दया (Daya) म्हणजेच दिशा वकानी (Disha Vakani) आणि तारक मेहता (Tarak Mehta ) म्हणजेच शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांच्यानंतर आता राज अनादकट (Raj Anadkat) हा शो सोडणार आहे. राज तारक मेहता का उल्टा चष्मा मधील लोकप्रिय पात्र टप्पू (Tappu) ची भूमिका साकारत होता. 2017 पासून राज या शो सोबत जोडला गेलेला होता. अशाच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सोडल्याची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
राज म्हणजेच टप्पूने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहून शो सोडल्याबद्दलची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की,”सर्वांना मनापासून नमस्कार! सर्व प्रश्न आणि सर्व अंदाजांना पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा आणि नीला प्रोडक्शन यांच्यासोबत माझा संबंध अधिकृतपणे संपला आहे. माझ्या आयुष्यातील शिकण्याचा, मित्र बनवण्याचा आणि सर्वोत्तम क्षण घालवण्याचा हा एक अद्भुत प्रवास होता.”
राज पुढे म्हणाला की,”या प्रवासामध्ये मला तारक मेहता का उल्टा चष्माची टीम, माझे मित्र, माझे कुटुंब आणि माझे सहकारी सर्वांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो. त्याचबरोबर या शोसाठी मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे धन्यवाद! माझ्या कलेवरील तुमचे प्रेम मला नेहमी प्रेरित करत असते. तारक मेहता का उल्टा चष्माच्या टीमला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! मी लवकरच तुमच्या सर्वांच्या मनोरंजनासाठी परत हाजीर होईल. तुम्ही तुमचे प्रेम आणि पाठिंबा राहू द्या.”
Tarak Mehta Ka Ulta Chashma | तारक मेहतानंतर 'टप्पू'ने केलं तारक मेहता का उलटा चष्माला रामरामhttps://t.co/0XvjCP8OY0
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 7, 2022
राजने शेअर केलेल्या या पोस्टनंतरच्या चाहत्यांमध्ये निराशा निर्माण झाली. चाहत्यांनी त्यांच्या भावना कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त केल्या आहेत. यामध्ये एक चाहता कमेंट करत म्हणाला आहे की,”आम्ही तुला नेहमी सपोर्ट करत राहू”. तर अजून एक जाता कमेंट करत म्हणाला आहे की,”मनोरंजनासाठी खूप खूप धन्यवाद टप्पू.”
महत्वाच्या बातम्या
- Fennel Health Benefits | रिकाम्या पोटी बडीशेप खाल्ल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- PM Kisan Yojana | देशात ‘इतके’ कोटी शेतकरी घेत आहेत PM किसान योजनेचा लाभ, केंद्र सरकारने जारी केला नवा आकडा
- Skin Care Tips | हिवाळ्यामध्ये त्वचा चमकदार बनवण्यासाठी वापरा मधापासून बनवलेले ‘हे’ घरगुती फेस पॅक
- Devendra Fadanvis | “… म्हणून सगळी माहिती ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत मी पोहचवणार आहे”, देवेंद्र फडणवीस
- Devendra Fadanvis | “शरद पवारांना बेळगावात जायची गरज पडणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

