Share

कोण गरळ ओकतंय हे काल पंकजा मुंडे यांनीच सांगितलं आहे – अरविंद सावंत

Published On: 

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर घणाघाती टीका केली. काल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया,भाजपचे राजकारण,हिंदुत्व यासह अनेक मुद्द्यांवर भाजपवर हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी आज सडेतोड उत्तर दिलं आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचाराचं सोनं लुटलं जायचं. पण काल त्यांना गरळ ओकताना पाहिलं. जनतेने भाजपला नाकारलं नाही. काँग्रसे राष्ट्रवादीला नाकारलं. शिवसेनेला वरपास केलं याचं त्यांना विस्मरण झालं आहे. आम्ही 70 टक्के जागा जिंकल्या. तुम्ही 45 टक्के जागा जिंकल्या. तुम्हाला जनतेने नाकारलं. हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे, असं ते म्हणाले. फडणवीसांची टीका शिवसेनेला चांगलीच बोचली आहे.

फडणवीसांनी केलेल्या या टीकेला आता  शिवसेना नेते, खा. अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे . कोण गरळ ओकतंय हे काल पंकजा मुंडे यांनीच सांगितलं आहे, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.अरविंद सावंत यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला. यावेळी त्यानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक मुद्याचं खंडन केलं. काल पंकजा मुंडे यांनी देखील भाजपला शालजोडीतून घराचा आहेर दिला आहे. रोज उठतात आणि सरकार पडलं असं म्हणतात. त्यामुळे कोण गरळ ओकत आहे ते पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे, असा चिमटा सावंत यांनी काढला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!