Share

सावधान सावधान वणवा पेट घेत आहे… अरविंद जगताप यांची साद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गोष्ट छोटी डोंगराएवढी, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि चला हवा येऊ द्या मधील पत्राच्या माध्यमातून अनेकाच्या काळजाला साद घालणारे लेखक म्हणजे अरविंद जगताप. यावेळी त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून हरवलेल्या मराठी माणसाला साद घातली आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंद्यात मागे पडत असलेल्या मराठी माणसावर आणि याला कारणीभुत असणाऱ्या व्यवस्थेवर त्यांनी अपल्या ब्लॉगच्या माध्यमातून भाष्य केले आहे.

या ब्लॉगमध्ये सुरुवातीला त्यांनी मराठी माणसाचे कौतुक करताना हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा सह्याद्री म्हणून पाठ थोपटून घेणारे आपण अशा शब्दात कौतुक केले आहे. मराठी माणूस व्यवसायात का नाही हा त्याच्या या ब्लॉगचा मुख्य धागा आहे. यावर होणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राज्यात वाढत जाणारा व्यापारातील अमराठीपणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात सर्व जाती पंथाचे लोक मोठे होत आहेत. मात्र या साऱ्यात मराठी माणूस कुठे आहे असा प्रश्न त्यांनी केला आहे. स्वतःच्या राज्यात इतर लोक प्रगती करू देत नाहीत असं म्हणणं म्हणजे वेडेपणा होईल.

https://www.arvindjagtap.com/singleshow?id=164&&path=kathas

या ब्लॉगमध्ये त्यांनी राजकारण, घराणेशाही, राज्यातील प्रशासनावर असलेले दिल्लीचे नियंत्रण याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याची निवड ही दिल्लीतुन होत असल्याने येथील कारभार दिल्लीच्या कलाने चालतो असे त्यानी म्हटले आहे. राजकारण हाच उद्योग होऊन बसल्याने मराठी माणस उद्योगधंद्यात मोठी कशी होणार असा सवाल त्यांनी केला आहे. कित्येक तालुके, जिल्हे एखाद्या राजकीय घराण्याचे गुलाम बनले. उद्योगपतीच्या कामगाराला नोकरी मिळते पण उद्योगपतीला नाही. राज्यातील युवकांच्या मनात प्रश्न ठाकरे की फडणवीस हा नसला पाहिजे. प्रश्न नौकरी का उद्योगधंदा हा असला पाहिजे. असे म्हणत त्यांनी अपल्या झेंडा चित्रपटातील सावधान हे गीत लिहिल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!