नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
सध्या प. बंगाल विधानसभा निवडणूक प्रचार जोरात सुरु असताना दुसरीकडे तामिल्नादुम्द्ये देखील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी एका सभेत बोलताना द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिने यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छळामुळे आणि दबावामुळेच भाजपा नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाल्याचे असे धक्कादायक आरोप त्यांनी केले आहेत. एका वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
.@Udhaystalin ji, I know there is election pressure – but I won't stay silent when you lie & disrespect my father's memory.
Dad @arunjaitley & Shri @narendramodi ji shared a special bond that was beyond politics. I pray you are lucky enough to know such friendship…@BJP4India
— Sonali Jaitley Bakhshi (@sonalijaitley) April 1, 2021
मात्र यांनतर या गंभीर आरोपांना सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज तसेच अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. यावेळी सोनाली जेटली म्हणाल्या की, उदयनिधीजी, मला माहित आहे की निवडणुकीचा दबाव आहे – परंतु जेव्हा आपण खोटे बोलता आणि माझ्या वडिलांच्या स्मृतींचा अनादर करता तेव्हा मी गप्प बसणार नाही. बाबा आणि मोदिजी यांच्यातील नाते राजकारणापलीकडचे होते. ही मैत्री तुम्हाला समजावी ही प्रार्थना करते. असे त्यांनी यावेळी उदयनिधी यांना सुनावले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या दबावामुळेच अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू’ द्रमुकच्या नेत्याचे गंभीर आरोप
- शाहरुखला आयपीएलआधी मोठा दिलासा ; ‘हा’ खेळाडू कॅम्पमध्ये होऊ शकतो सहभागी
- ‘उगाच इंदिरा गांधी किंवा मोदी-शहाप्रणीत भाजपास दोष का द्यायचा ?’
- आयपीएल न खेळता ‘या’ खेळाडूला मिळणार 7 कोटी रुपये
- आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला ; टी नटराजनला मिळाली थार


