मुंबई : संपूर्ण देशात कोरोना व्हायरसमुळे बिकट परिस्थिति निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून अनेक भागात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात अनेकांना याचा मोठा फटका बसला. मनोरंजन क्षेत्राला देखील याचा चांगलाच फटका बसला आहे. चित्रपटगृहे बंद असल्यामुळे निर्मात्यांना चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावे लागत आहेत.
यामुळे मागील वर्षापासून अनेक उत्तम वेब सीरीज प्रेक्षकांना पाहायला मिळाले. यातील एक म्हणजे ‘असुर’ वेब सीरीज. या सीरीजमध्ये अरशद वारसी मुख्य भूमिकेत दिसला होता. मालिकेच्या अपार यशानंतर आता त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अरशद वारसीचे ‘असुर’ मधील त्याच्या भूमिकेचे खूप कौतुक केले गेले होते.
‘असुर’ या वेब सीरीजमध्ये अरशद वारसी सीबीआय अधिकारी धनंजय राजपूतच्या भूमिकेत दिसला होता. तसेच बरुण सोबती यांनी फॉरेन्सिक तज्ञाची भूमिका केली. अभिनेत्री रिद्धि डोगरानेही यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता नवीन सीरीजची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
पहिल्या सीझनचे यश लक्षात घेऊन त्याच्या दुसर्या भागाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. नवीन हंगामात पहिल्या हंगामाप्रमाणेच निर्माते सस्पेन्स सादर करणार आहेत. या आठवड्यापासून नवीन मालिकेचे शुटिंगही सुरू होणार असल्याचे समजत आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का ; ‘या’ स्टार खेळाडूची माघार
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी


