Share

अर्णब गोस्वामींच्या अडचणी आणखी वाढल्या; शाळेतून आता थेट कारागृहात रवानगी

Published On: 

अलिबाग : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती.

काल अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने आज त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.म्हणजेच सोमवारी त्याच्या वकिलांना जामीनाविषयी सत्र न्यायालयात याचिका दाखल करता येईल.

दरम्यान, अर्णब गोस्वामी याची खारघर येथील तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सद्या त्याला कारागृहातील विलगीकरण कक्षातच ठेवण्यात येईल. दुसरीकडे अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान, या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर देखील काल जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असता, अर्णबच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी घेतली जाईल असे सत्र न्यायालयामार्फत सांगण्यात आल्याने उद्या त्याच्या जामीनावरील सुनावणी सोबतच न्यायालय अर्णबला पोलीस कोठडी सुनावणार का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!