Share

आयपीएलसाठी अर्जुन तेंडुलकरची जोरदार तयारी, शेअर केला व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केला. यामुळे बीसीसीआयने ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगीत करावी लागली. यानंतर काही दिवसातच उर्वरीत स्पर्धा युएई येथे आयोजीत करण्याची घोषणा बीसीसीआयने केली.

काही दिवसातच बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. येत्या १९ सप्टेंबरपासुन आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. मात्र स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आतापासुनच सरावाला सुरुवात केली आहे. गोलंदाजीत कौशल्य असलेल्या अर्जुनने यावेळी फलंदाजी करतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडीयावर शेअर केले आहे. यात अर्जुन तेंडुलकर विविध प्रकारचे फटके मारताना दिसत आहे. यात त्याने कव्हर ड्राईव्ह, बॅकफुट पंच तर यॉर्करवर थर्ड मॅनला शॉट लगावला. तसेच फिरकीपटू गोलंदाजाला स्विप शॉट मारला.

आयपीएल २०२१च्या लिलावात अर्जुनला मुंबई इंडियन्सने त्याच्या मुळ किमतीत खरेदी केले होते. मात्र स्पर्धेत त्याला संधी मिळाली नव्हती. कारण मुंबईच्या संघात एकापेक्षा एक सरस गोलंदाज आहेत. त्यामुळे त्याची खेळण्याची शक्यता कमीच होती. यामुळे अर्जुनने फलंदाजीचा सराव सुरु केला असा अंदाज क्रिकेट रसीक व्यक्त करत आहे. आयपीएल २०२१चा उर्वरीत हगांमातील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघादरम्यान आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!