🕒 1 min read
दिग्विजय दीक्षित : कालचा मुंबई आणि बंगलोरचा सामना पाहताना, सुर्यकुमार यादव या तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूने केलेली कामगिरी पाहता; या खेळाडूला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘भारतीय संघात स्थान का मिळाले नसावे’ हा मुद्दा क्रिकेटप्रेमींच्या मनात डोकावलेला आहे. Social माध्यमांमध्ये सुद्धा हा मुद्दा बऱ्याच प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला आहे. या खेळाडूची अशी चांगली कामगिरी ही केवळ कालची किंवा केवळ या IPL मधली नसून, गेल्या ३ वर्षात हा खेळाडू मुंबई इंडियन्स कडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी करत आलेला आहे.
खरे पाहता याची सुरवात २०१२ साली झाली जेव्हा मुंबई संघाने या खेळाडूला आपल्या गोटात सामील करून घेतले. परंतु मुंबई मध्ये आधीपासून असलेल्या दिग्गज खेळाडूंमुळे त्याला प्रत्यक्ष खेळायला संधी मिळाली नाही. २०१४ साली शाहरुखच्या कोलकाता संघाने याला लिलावांमध्ये खरेदी केले आणि तेथून सूर्याचा खरा प्रवास सुरु झाला.
कोलकाता संघाकडून चांगली कामगिरी करताना मुंबईच्या निवडकर्त्यांची आणि संघ व्यवस्थापनाची नजर पुन्हा या खेळाडूवर गेली. २०१८ साली पुन्हा मुंबईने तब्बल ३.२ कोटी रुपयांना या खेळाडूला विकत घेतले आणि मग हा खेळाडू थांबलाच नाही. २०१८ सालच्या IPL मध्ये ५१२ धावांसह, मुंबईकडून सर्वाधिक धावा. त्यानंतर २०१९ सालच्या IPL मध्ये ४२४ धावांसह डिकॉकच्या नंतर मुंबईसाठी धावसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर हा खेळाडू राहिला.
यंदाच्या मोसमातसुद्धा १२ सामन्यात ४०.२२ च्या सरासरीने तब्बल ३६२ धावा सूर्याने केलेल्या आहेत. धावांच्या गुणपालिकेत ११ व्या क्रमांकावर आणि मुंबईसाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या खेळाडूचा strike rate मात्र १५०+ आहे. एकूणच सांघिक अंकतालिका पाहता मुंबईचा संघ हा playoff मधील प्रबळ दावेदार आहेच, त्यामुळे हा खेळाडू अजून कमीत कमी ४ सामने नक्कीच खेळेल. उर्वरित सामान्यांसाठी या जबरदस्त खेळाडूस भरभरून शुभेच्छा आणि लवकरच भारतीय संघाच्या निळ्या रंगाच्या पोशाखात हा खेळाडू आपल्याला दिसेल अशी अपेक्षा करूया…!
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : तातडीने घटनापीठ स्थापन करा! सरकारची मुख्य न्यायमुर्तींना दुसऱ्यांदा विनंती
- नगरच्या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजा व खसखसची शेती करू द्या!
- १ नोव्हेंबरपर्यंत मंदिरे उघडा अन्यथा टाळे तोडू; भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा इशारा
- मुंबई : ९०० कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा सोमय्या यांचा आरोप;चौकशी करण्याची मागणी
- चाहत्यांच्या प्रश्नावर शाहरुखने दिले ‘असे’ मिश्किल उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
