Share

पुरग्रस्तांना मदत करणार आहात की नाही? का फक्त पाहणीवरचं भागवायचं?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री या भागाचा दौरा करत आहेत. मात्र, राज्य सरकारच्या वतीने अजूनही ठोस आर्थिक मदत या पूरग्रस्त भाागातील नागरिकांना देण्यात आलेली नाही. यावरुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे.

या संदर्भात टीका करताना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांची खोचक प्रश्न विचारला आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, ‘राज्य सरकार फक्त पाहणीचं करतयं… पुरग्रस्तांना मदत करणार आहात कि नाही? का फक्त पाहणीवरचं भागवायचं?’

पूरग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात येत आहे. वास्तविक अद्याप कोणतीच ठोस आर्थिक मदत पूरग्रस्तांना देण्यात आलेली नाही. मात्र, सर्वच नेते या भागाचे दौरे करून पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहे. यावरुन आधी प्रत्यक्ष मदत करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!