नवी दिल्ली: सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए बाबत ‘यूजीसी’ने घेतला महत्त्वाचा निर्णय आहे. आता या परीक्षा पदव्युत्तर पदवीच्या समकक्षेत येणार आहेत. त्यामुळे आता सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांना नेट परीक्षेसाठी वेगळी पदव्युत्तर पदवी घेण्याची आवश्यकता नसेल
यूजीसी’च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या पदव्यांना पदव्युत्तर पदवीचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याचे परिपत्रक यूजीसीने प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नेट परीक्षेसाठी पात्र ठरतील. ही पदवी घेतलेले विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक बनू शकतील. तसेच पीएचडी किंवा परदेशी विद्यापीठात प्रवेश घेणे शक्य होणार आहे.
जगात भारत वगळता सीए, सीएस किंवा आयसीडब्ल्यूए ही पात्रता पदव्युत्तर पदवीच्या समकक्ष मानली जाते. तर आता भारतात देखील हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थांचा वेळ आणि पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी वेगळी तयारी करावी लागणार नाहीय.
महत्वाच्या बातम्या
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- शरद पवारांनी अनिल देशमुखांना केले सेफ, डॅमेज कंट्रोल म्हणून परमबीर सिंहांची विकेट पडणार ?
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
