🕒 1 min read
मुंबई : राज्यातील आरोग्य सेवेतील गट क आणि ड दर्जाच्या पदांसाठी २५ सप्टेंबर रोजीची तारीख जाहीर झाली होती मात्र काही तांत्रीक अडचणींमुळे राज्य सरकारने तारीख पुढे ढकलली होती. आता २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी या पदांसाठी परीक्षा होणार आहेत. सोमवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. यावर भाजपाने टीका केली आहे. आयत्या वेळी परीक्षा रद्द करुन आठ लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप देणाऱ्या न्यासा कंपनीला पुन्हा याच परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यावरुन भाजपाने ही टीका केली आहे.
राज्यात २५ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्या गट क आणि ड पदासाठी परीक्षा होणार होत्या. या साठी राज्यातील ८ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र कोणतेही कारण न देता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले होते. आता नविन तारखा जाहीर केल्या आहेत. यावर भाजपाने टीका केली आहे.
आयत्या वेळी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून आठ लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप देणाऱ्या न्यासा कंपनीला पुन्हा याच परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आलेय. कारवाईचे इशारे देणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांचे हात काय देवाणघेवाणीच्या दगडाखाली अडकलेत? #MahaNapasAghadi pic.twitter.com/h8GyhyLPO1
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) October 1, 2021
भाजपाच्या मुंबई ट्विटर हँडलवरुन हे ट्विट करण्यात आले आहे. ‘आयत्या वेळी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द करून आठ लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप देणाऱ्या न्यासा कंपनीला पुन्हा याच परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आलेय. कारवाईचे इशारे देणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांचे हात काय देवाणघेवाणीच्या दगडाखाली अडकलेत?’ अशी टीका भाजपाने केली आहे.
आरोग्य विभागात गट क संवर्गाच्या २,७३९ पदावाठी व गट ड साठी ३,४६६ पदांसाठी या परीक्षा होत आहेत. आता या परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी गट क साठी तर ३१ ऑक्टोबर रोजी गट ड साठी परीक्षा होणार आहेत. सोमवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मिरज दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
- धक्कादायक! नॅशनल बॅडमिंटनपटूचा राहत्या घराच्या छतावर संशयास्पद मृत्यू
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- तुम्ही दिल्लीचा गळा दाबला, शहरात येण्याची परवानगी मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांनाच फटकारलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

