Share

UPSC Recruitment | UPSC यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: UPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्र सरकार एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. देशात एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना. दुसरीकडे केंद्र सरकार अनेक भरती प्रक्रिया राबवत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC यांच्यामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या पदाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पदानुसार इच्छुक उमेदवार या upsc.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

UPSC यांच्या मार्फत विविध पदांच्या रिक्त जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC यांच्या मार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 160 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या 160 पदांमध्ये वरिष्ठ कृषी अभियंता, कृषी अभियंता, सहाय्यक संचालक, सहायक रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक जलशास्त्रज्ञ, कनिष्ठ टाइम स्केल, सहाय्यक भूवैज्ञानिक, सहायक भूभौतिकशास्त्रज्ञ आणि व्याख्याता इत्यादी पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता

युवकांना सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी यूपीएससी मार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी या भरती प्रक्रियेतील पदांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवारांनी या upsc.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख

UPSC मार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 1 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!