Share

अरारा रा.. खतरनाक! विजयासाठी ३५ धावा असताना मारले सलग सहा षटकार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रिकेटमध्ये रोमहर्षक सामना म्हणलं की डोळ्यासमोर उभा राहतो की अखेरच्या चेंडुवर सहा धावांची गरज असताना मारलेला षटकार. मात्र एक पठ्ठ्याने अखेरच्या षटकात ३५ धावांची गरज असताना चक्क सहा षटकार मारत सामना जिंकुन दिला.

लगान व्हॅली स्टील्स टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आयरीश क्लब आणि बालिमोनोला क्रेगाघो संघात सामना सुरु होता. आयरीश क्लबला अंतिम षटकात ३५ धावांची गरज होती. तेव्हा क्रेग्राघो संघ सहज विजयी होईल असा सर्वांचा अंदाज होता. मात्र आर्यलँडचा खेळाडू असलेला जॉन ग्लासच्या मनात काहितरी वेगळच होतं. अखेरच्या षटकात तो स्ट्राईकवर होता.

या षटकापुर्वी आयरीश क्लबच्या ७ बाद ११३ धावा होत्या. यानंतर मात्र मैदानात जॉन नावाचे वादळ आले. अखेरच्या षटकात जॉनने सलग सहा षटकार मारत आयरीश क्लबला विजय अशक्यप्राय विजय मिळवून दिला. सामन्याअखेर ग्लास ८७ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तर याच सामन्यातील पहिल्या डावात ग्लासच्या भावाने हॅटट्रिक नोंदवली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!