Share

साराचे हावभाव पाहून चाहते झाले फिदा; पाहा व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडमध्ये नावारूपाला आलेली अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. तिच्या चित्रपटाची नेहमीच चर्चा होत असते. मात्र काल ‘वर्ल्ड इमोजी डे’ निमित्त तिने शेअर केलेल्या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

https://www.instagram.com/reel/CRbbWZaJHGM/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडीओमध्ये सारा वेगवेगळ्या इमोजींच्या हावभावाची नक्कल करताना दिसत आहे. साराने तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर तिच्या फॅन्सचा कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या या मजेदार व्हिडीओचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओत साराने 30 सेकंदात 15 वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन दिले आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिनेत्री सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने सिंबा, लव्ह आज कल, कुली नंबर १ या चित्रपटात झळकली. सारा अली खानच्या लवकरच  ‘अतरंगी रे’ चित्रपटातून भेटीला येणार आहे. याआधी तिचे बऱ्याच अभिनेत्यांसोबत नावही जोडले गेले. तसेच ड्रगज कनेक्शनमध्ये साराचेही नाव घेतले गेले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!