Share

‘सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध’; चित्रा वाघ राऊतांवर कडाडल्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शनिवारच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत टिप्पणी करत केंद्र सरकारवर केली होती. या टीकेला आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा उल्लेख सोनिया सेनेचे प्रवक्ते असा देखील केला आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत ह्यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात. अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो… हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे,’ अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

पूढे त्यांनी, ‘आपणास असं खरेच वाटत असेल तर आपल्या राज्याचे सन्माननीय यांची सुरक्षा काढून घ्यावी आणि स्वतःपासून आदर्श घालून द्यावा असा प्रयोग करायला काय हरकत आहे?, गेली दीड वर्ष मा.मुख्यमंत्रीजी हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच व्यतित करतात… ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही,’ असा टोला देखील लगावला.

सामना अग्रलेखात काय म्हटलं होतं ?

शनिवारच्या सामना अग्रलेखातून राजकीय नेत्यांची सुरक्षाव्यवस्था, त्यांच्या सुरक्षेविषयी घेतली जाणारी काळजी आणि दिवसेंदिवस होत चाललेला अतिरेक, यावर भाष्य करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क सुरक्षा यंत्रणांनी लोकांना उतरवायला सांगितले. दुसरीकडे अमित शहा यांच्या एका दौऱ्यात सुरक्षा यंत्रणांनी लोकांना घरांच्या दारे, खिडक्या बंद ठेवायला सांगितल्या. यावरुन हे भीतीचेच लक्षण नाही का?, असा सवाल करत कलियुग म्हणतात ते हेच का? असे सवाल सामनातून उपस्थित करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!