Share

‘परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मंजूरी द्या’

Published On: 

🕒 1 min read

परभणी : परभणी संघर्ष समितीकडून परभणी शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजुरी मिळावी म्हणून माजी आ. विजय गव्हाणे हे मुंबईत ठाण मांडणार आहेत. परभणी शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे या मागणीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची परभणी संघर्ष समितीकडून भेट घेण्यात आली होती.

या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण यानतंर झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयात उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली. पण परभणीच्या वाटेला पुन्हा निराशा आली. आता यासाठी येत्या 18 ते 20 जानेवारी दरम्यान आपण मुंबईत तळ ठोकून वरिष्ठ नेत्यांकडे मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. विजय गव्हाणे यांनी सांगितले. यादरम्यान परभणी शहरातील नेतेमंडळीनी आपसातील मतभेद बाजुला ठेवूण एकत्र यावे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी योगदान द्यावे अशी मागणी माजी आ. गव्हाणे यांनी केली.

मागीस आठवड्यात उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. या अंतर्गत 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आणि त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय निर्माण होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!