Share

इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरण्यासाठी विराट कोहली सज्ज, पहा व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड  यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. इंग्लंडचा संघ टीम इंडियाविरुद्धच्या  मालिकेसाठी भारतात पोहोचला आहे. भारतातल्या आगमनाचा व्हिडिओ इंग्लंड टीमच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. भारतीय संघही चेन्नईच पोहोचला आहे. अशातच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने एक व्हिडीओ ट्विट करत आपण हॉटेलमध्येच मॅचसाठीच्या तंदुरुस्तीची तयारी करत असल्याचं सांगितलं आहे.

गुरुवारी भारतीय क्रिकेटपटूंसाठी कोरोना आरटी पीसीआरची पहिली चाचणी घेण्यात आली असून सर्व खेळाडूंची पहिली चाचणी निगेटीव्ह झाली आहे. 2 फेब्रुवारीपासून सराव सुरु करण्यापूर्वी खेळाडूंच्या आणखी दोन चाचण्या होणार आहेत.

भारतीय संघ याआधीच चेन्नईला पोहोचला आहे आणि खेळाडूंना लीला हॉटेल पॅलेसमधील खोल्यांमध्ये क्वारन्टाईन करण्यात आलं आहे. सराव करण्यासाठी तसंच स्वत: ला पूर्णपणे फिट करण्यासाठी सर्व खेळाडू आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीने हॉटेलच्या खोलीत व्यायामाचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये तो सायकल चालवताना दिसत आहे.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कोहलीने संदेश दिला की हॉटेलच्या खोलीत राहूनही तो किती आपल्या वेळेचा किती सदुपयोग करतो. पोस्टमध्ये विराटने लिहिले आहे की, “क्वारन्टाईनच्या दिवसांत आपल्याला संगीत आणि जिमची आवश्यकता असते. जर तुम्हाला खरोखर कठोर परिश्रम करायचे असतील तर ते कुठेही केले जाऊ शकते. प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक दिवस खास असतो…”

https://www.instagram.com/p/CKnsxNWAzNl/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!