Share

रेल्वे राज्यमंत्री पदाचे सूत्र स्वीकारताच रावसाहेब दानवेंची लोकलबाबत मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार होता. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला आहे. तर, दिग्गज मंत्र्यांकडून कार्यभार काढून घेत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आहे. आपल्या पदाचे सूत्र स्विकारताच दानवे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास करण्यास बंदी घातली आहे. पण रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाचा चार्ज घेताचं लोकलबद्दल महत्त्वाची घोषणी केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी पदभार स्वीकारताना दिलं आहे.

‘जेव्हा राज्याला वाटेल कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे. तेव्हा राज्याने यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर त्यावर योग्य आभ्यास करून त्याठिकाणी रेल्वे व्यवस्था सुरळीत करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. राज्य सरकारने विनंती केल्यास तातडीने लोकल सेवा सुरु करु’ असं म्हणत दानवे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!