Share

अनुराग कश्यपची मुलगी डेटिंग आणि मद्यपानाबाबत सगळ सांगते आई-वडिलांना

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवुड चित्रपट निर्माता अनुराग कश्यप नेहमीच त्यांच्या वक्तव्यांबद्दल सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनुरागप्रमाणेच त्यांची मुलगी आलिया देखील कायम चर्चेत असते. वडिलांप्रमाणेच आलियासुद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकतंच आलियाने एक विधान केलं आहे जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आलिया अनुराग कश्यप आणि आरती बजाज यांना सर्वात जवळचं म्हणजेच मित्र मानते आणि त्यांच्यासोबत सर्व काही शेअर करते. डीएनएच्या वृत्तानुसार, तिनं असं सांगितलं की ती तिच्या पालकांशी सर्व काही उघडपणे बोलते. माझे आईवडील माझ्याशी माझ्या मित्राप्रमाणं वागतात म्हणून मी त्यांच्यापासून काहीही लपवत नाही. पुढे ती म्हणते की तिने तरुण तरुणींवर बरेच प्रयोग केले आहेत. मी जेव्हा काही मद्य किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तेव्हा तेव्हा माझ्या आई-वडिलांना सांगितलं. तुम्हीही अशा गोष्टी त्यांच्यापासून कधीही लपवू नका.

तर पुढे तिनं सांगितलं आहे की तिच्या डेटिंग आयुष्याविषयी सुद्धा तिच्या आईला सर्व काही माहित असते, जेव्हा ती कोणत्याही मुलाशी बोलते किंवा त्याच्याबरोबर डेटवर जाते तेव्हा तिची आई तिला सर्व समजावून सांगते. पण ती व अनुरागला तिच्या डेटिंगबद्दल सांगत नाही. काही गंभीर झाल्यावरच ती वडिलांना ती गोष्ट सांगते, असा खुलासा तिने केल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केल जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!