औरंगाबाद : पावसाळ्याच्या तोंडावर मनपाने तयारी सुरु केली आहे. शहरातील खाम व सुखना नदीपात्रात पावसात पुराचा धोका दर्शवण्यासाठी ब्लू व रेड लाइनची मार्किंग केली जाणार आहे. पावसाळ्यात या नद्या ओव्हरफ्लो झाल्यास नागरिकांना धोक्याची पातळी कळावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच आत्तापर्यंत पालिकेने ७० टक्के नाल्यांची स्वच्छतेची कामे पूर्ण केली आहेत. शहरात ११२ किलोमीटरचे लहान व मोठ्या आकाराचे नाले असून पावसाळा सुरू होईपर्यंत सर्व नाल्यांची आधीच स्वच्छता झालेली असेल, असे सूत्रांनी सांगितले.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शुक्रवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी शहरातील नाल्यांची स्वच्छता, शहर परिसरातील तलाव व नद्या, त्यांची पाणीपातळी याविषयी माहिती गोळा करण्याची सूचना जिल्हाधिकार्यांनी पालिकेला केली आहे. याविषयी पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या अनुषंगाने शहरातून वाहणार्या खाम व सूखना नदीपात्रात ब्लू व रेड लाईनची मार्किंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सूनपूर्वी तयारीअंतर्गत नदीकाठी राहणार्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्याची वेळ आल्यास त्यासाठी मोठे हॉल, शाळा, समाजमंदिराची यादी तयार केली जाणार आहे.
यामुळे नदीकाठी राहणार्या नागरिकांना पुर परिस्थितीत नदीतील पाण्याच्या धोक्याची पातळी कळेल. पुर परिस्थितीत नदीकाठी राहणार्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्याची परिस्थिती ओढावल्यास जवळच्या शाळा, समाजमंदिर, मोठे हॉल यांची यादी तयार केली जाणार आहे. पोहण्यात तरबेज असणार्यांची फोन क्रमांकासह यादीही तयार केली जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे आपत्कालीन कक्ष, प्रभागनिहाय्य अधिकार्यांची नियुक्ती केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना थांबेना : दिल्लीत लॉकडाऊन वाढवला; अरविंद केजरीवाल यांची घोषणा
- …पण मी कांगावाखोरांना उत्तर देत नाही; फडणवीसांच पटोलेंना प्रत्युत्तर
- ‘मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला’, पंकजा मुंडेंच्या भावना
- ‘डिअर राजीव, वुई विल मिस यू’, सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ व्हिडिओची चर्चा
- कोहलीच्या समर्थनार्थ पुढे आला ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू ; मायकल वॉनची अशी घेतली शाळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

