Share

अनुपम खेरने आईला विचारला प्रश्न ; “गंजू पटेल अशी हाक का मारतेस?”

Published On: 

मुंबई : सगळे हसले! जाऊ द्या! तुम्ही पण हसाल!”,असे कॅप्शन देत बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर त्यांच्या आईसोबतचा असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जे पाहून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. अनुपम खेर सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

दरम्यान अनुपम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुपम त्यांच्या आईला विचारतात की त्या ‘गंजू पटेल म्हणून त्यांना हाक का मारतात?’ त्यावर त्यांची आई मजेशीर उत्तर देत म्हणताता तू जन्मात टकला होतास. हा व्हिडीओ शेअर करत “आई मला सतत गंजू पटेल म्हणून हाक मारयची, पण ती असं का बोलते असा प्रश्न शेवटी मी तिला विचारला. सहानुभूतीदेत उत्तर देण्या ऐवजी, आईला मला तिचा तळहात दाखवलं आणि खरं कारण सांगत सत्याचा सामना करून दिला! आणि नंतर माझ्या लहानपणाच्या काही गोष्टी सांगितल्या. सगळे हसले! जाऊ द्या! तुम्ही पण हसाल!”,असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

https://www.instagram.com/tv/CWEDbQVF0OV/?utm_source=ig_web_copy_link

अनुपम सध्या सूरज बडजात्या यांचा आगामी चित्रपट ‘उंचाई’च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटात अनुपम यांच्या व्यतिरिक्त परिणीती चोप्रा, बोमन इराणी, अमिताभ बच्चन, नीना गुप्ता, सारिका आणि डॅनी डेन्झोंगपा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!