औरंगाबाद : कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल येण्यास २४ तासांचा वेळ लागतो. परिणामी, संपर्कातील संपर्क अधिकाधिक वाढून परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोना रूग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या अॅन्टिजेन चाचण्या करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात कोरोना रूग्णांची संख्या गतीने वाढत असतानाच आता ग्रामीण भागांतूनही अधिक रूग्ण निघू लागले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसून आल्याने प्रशासनाने जिल्ह्यात गुरूवार (दि. ११) पासून अंशतः लॉकडाऊन लागू केला आहे.
तथापि, कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी रूग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यासाठी पालिकेने यंत्रणा कामाला लावली आहे. याबाबत पालिकेच्या डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शहरात पालिकेने रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांसाठी दहा मोबाइल पथके कार्यरत केली आहे. ही पथके कार्यरत केल्यापासून चाचण्यांचे प्रमाणही दुपटीने वाढले आहे. यातच कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये, यासाठी अॅन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे.
आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल येण्यास २४ तासांचा अवधी लागतो. यात अधिक वेळ जात असल्याने संपर्कातील संपर्क वाढून कोरोना संसर्गाची साखळी आणखी घट्ट होण्याची भीती आहे. असे झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. हे लक्षात घेऊनच आता अॅन्टिजेन चाचण्यांवर भर दिला आहे. अॅन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर गरज असेल त्यांची आरटीपीसीआर चाचणी देखील केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रायवाडीत छत्रपती शिवरायांचा पुतळा पूर्ववत बसवावा, अन्यथा आत्मदहन’
- परभणीतील शिवाजी महाराज पुतळ्याच्या शुशोभिकरणासाठी 50 लाखांची तरतूद
- एक काॅल करा व कचरा समस्येपासून मुक्ती मिळवा
- #IndvsEngT_20 : भारताला दोन मोठे झटके; के एल राहुल नंतर कोहली शून्यावर बाद
- इंजिनिअर होण्यासाठी आता PCM विषयांची गरज नाही


