🕒 1 min read
नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे अ प्रॉमिस्ड लँड हे पुस्तक पब्लिश झाल्या नंतर ह्या पुस्तकाची भारतातही खूप चर्चा झाली. सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल हे पुस्तक माझी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांनी नुकतेच पब्लिश केले आहे.
भारतात या पुस्तकाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे या पुस्तकात भारतीय राजकीय नेत्यांचा देखील उल्लेख केला गेला आहे. या पुस्तकामध्ये भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्याबाबतही उल्लेख केला गेला आहे.
एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार बराक ओबामा यांनी आपल्या या नव्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाड येथील खासदार राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख करतान म्हटले आहे की, राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती आहेत. एखादा विद्यार्थी जसा आपल्या अभ्यास करून शिक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच्यामध्ये त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची पात्रता नसते किंवा त्या विषयाबाबत आवडीचा अभाव असतो, तसं त्यांच्याबाबत घडत आहे.
Rahul Gandhi like student 'eager to impress' but lacks aptitude, says Barack Obama in memoir
Read @ANI Story | https://t.co/nmuaNlV8uy pic.twitter.com/2UCa2P2Lbs
— ANI Digital (@ani_digital) November 13, 2020
दरम्यान, बराक ओबामा यांनी आपल्या या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती असा उल्लेख ओबामा यांनी केला आहे. या पुस्तकामध्ये अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची याआधी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये ड्रिम्स फ्रॉम माय फादर, द ऑडेसिटी ऑफ होप आणि चेंज वी कॅन बिलिव्ह इन यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटील यांनी फक्त सरकार पडण्याची स्वप्न पहावीत; थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला!
- लढा सुरूच : बिहारमध्ये सत्ता महागठबंधनचीच येणार; तेजस्वी यादवांनी व्यक्त केला विश्वास
- तिकडे ट्रम्प हरले मात्र इकडं मोदी जिंकलेच – रावसाहेब दानवे
- ‘शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल’
- ‘या’ जिल्ह्यातील १६ पोलीस अधिकार्यांच्या तडकाफडकी बदल्या !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

