🕒 1 min read
नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस नेत्यांमध्ये असलेली धुसफूस काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून समोर आली आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे सोनिया गांधी यांच्या हाती देण्यात आली, यानंतर पुन्हा एकदा अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच देण्यात आले असल्याने काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस व गटबाजी समोर आली आहे.
काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले होते. तसेच, काँग्रेस पक्षाचे नेतृत्व हे गांधी घराणे सोडून इतर नेत्याकडे देण्यात यावे अशी मागणी जोर धरत असल्याचे दिसून येत आहे. आता काँग्रेसमधील एका नेत्यानं पत्र लिहून आणखीन एक मागणी केल्याचं समोर आलं आहे. हे पत्र लिहिलेल्या एका नेत्यानं राहुल गांधींच्या नेतृत्वासंदर्भात पत्रातून मागणी केली आहे.
मोठी बातमी: सुरेश रैना ‘आयपीएल’ ला मुकणार; वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला
2024 च्या निवडणुकीचं नेतृत्व राहुल गांधींकडे देऊ नये अशी मागणी केली आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये मोठा पराभव मिळाल्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधींकडे काँग्रेसची धुरा देऊ नये, अशी मागणी या काँग्रेस नेत्याने पत्राद्वारे केल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे.
देशात कोरोनाचा कहर सुरूच! सलग तिसऱ्या दिवशी तब्बल ७५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
2024च्या निवडणुकीत राहुल गांधी पक्षाचं नेतृत्व करून 400 जागा जिंकून आणू शकतील हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला आणि भाजपचा विजय झाला.’ अशी टीका देखील या नेत्याने या पत्रातून केल्याची माहिती मिळत आहे.
सामना अग्रलेख : परीक्षा न घेता पदव्या देण्याची महाराष्ट्र सरकारला हौस नाही!
काँग्रेस मध्ये सद्या दोन गट निर्माण पडल्याचे समोर आले आहे. यातील एक गट हा राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसची कमान देण्यात यावी अशी मागणी करणारा आहे तर दुसरा गट हा गांधी घराण्या-व्यतिरिक्त इतर नेत्याकडे नेतृत्व सोपवावे यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

