Share

अखेर शेतकरी आंदोलन स्थगित, मात्र…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: दीड वर्षांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन अखेर स्थगित करण्याचा निर्णय युनायटेड किसान मोर्चाने घेतला आहे. युनायटेड किसान मोर्चाने (SKM) नवीन कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन पुकारले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकरी कायदे रद्द करण्यात येतील असे घोषित केले होते. तसेच संसदेत हे कायदे रद्द करण्यात आले आहेत.

तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांनी आपापल्या घरी जावे, अशी विनंती केंद्र सरकारने शेतकऱ्यांना केली होती. मात्र हे आंदोलन अजून संपले नसल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता युनायटेड किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चधुनी (Gurnam Singh Chaduni) यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

युनायटेड किसान मोर्चाने हे आंदोलन स्थगित जरी केले असले तरी त्यांनी सरकारसमोर आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्याच सोबत सरकारसमोर मोठी अट देखील घातली आहे. युनायटेड किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चधुनी ( Gurnam Singh Chaduni) म्हणाले, आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत, मात्र ते संपवत नाही. सरकार जेव्हा सर्व गोष्टी मान्य करेल, तेव्हाच आम्ही धरणे संपवू. यासोबतच सर्व आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही चदुनी यांनी सरकारकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!