🕒 1 min read
श्रीनगर : अमरनाथ यात्रा करण्याची इच्छा असणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अमरनाथ श्राइन बोर्डाने अमरनाथ यात्रेच्या तारखांची घोषणा केलीय. यंदा अमरनाथ यात्रा २८ जून पासून सुरू होईल तर २२ ऑगस्ट पर्यंत चालेल. देशात कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना या यात्रेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
यंदाची यात्रा बालटाल मार्गे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या आधी पहलगाम, चंदनवाडी, शेषनाग आणि पंचतरणी मार्गे ही यात्रा केली जात होती. मात्र, यंदा यात्रेच्या मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती अमरनाथ श्राइन बोर्डाचे अध्यक्ष तथा जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली आहे. सिन्हा यांनी या संदर्भात राजभवनामध्ये बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. कोरोना नियमांचे पालन करत यंदाची यात्रा पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यावेळी आधी तारखांची घोषणा करण्यात आली, त्यानंतर यात्रा रद्द करण्यात आली होती. या सर्व गोंधळामुळे विरोधकांनी भाजप आणि श्राइन बोर्डावर टीकाही केली होती. यंदा मात्र, कोरोना संकटातही यात्रा पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नितीन राऊत एकतर्फी निर्णय घेतात; नागपुरात लॉकडाऊनवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
- …म्हणून जॅकी श्रॉफ यांनी घरकाम करणाऱ्या मुलीच्या घरी जाऊन केलं कुटुंबीयांचं सांत्वन
- २ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय; वीजबिल वसुलीवरून राजू शेट्टी भडकले
- मोदींना कडाडून विरोध करणारे यशवंत सिन्हा राजकारणात पुन्हा सक्रीय का झाले ?
- ‘काही मंत्री मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचत आहेत’, मेटेंचा गंभीर आरोप


