🕒 1 min read
अहमदनगर:- केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली होती. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार असं चित्र निर्माण झालं होतं.
मात्र काल सरकारच्यावतीने केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन पुन्हा एकदा अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आज जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांनी जे आंदोलन स्थगित केलय त्याच्यावर बनवाबनवी होऊ नये, दिलेला शब्द भाजपने पाळावा, नाहीतर यापुढेही अण्णांसोबत राहू हे सांगायला आलो, असे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले. ते tv9 मराठीशी बोलत होते.
अण्णांना भेटल्यानंतर एक प्रकारे ऊर्जा मिळते म्हणून आलो होतो. 60 दिवस झाले तरी शेतकरी आंदोलन सुरू आहे. शांततेत चालू आहे. सरकार हट्टीपणा करतंय. कायदा ज्यांच्यासाठी आणला तेच जर आंदोलन करत असतील, तर ते मानलं पाहिजे. कायदा मागे घेतला तर सरकारचे फार मोठे नुकसान होणार नाही, असंही बच्चू कडू म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी राहुल द्रविडचा खास गुरु मंत्र, अजिंक्य रहाणेने सांगितलं गुपित
- आता मिळावा 69 हजारांच्या डाऊनपेमेंटमध्ये ‘ही’ कार खरेदी करण्याची संधी !
- आ. किशोर जोरगेवार यांनी घेतली मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची भेट
- ‘तुमच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सगळी कागदपत्रं माझ्या खिशात लवकरच सगळे डिटेल्स देतो’
- टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! इंग्लंडच्या ‘या’ धाकड फलंदाजाचे पुनरागमन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

