🕒 1 min read
अहमदनगर:- केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं गेल्या 29 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही सरकारला त्यात यश आलेलं नाही. सरकार तीन कृषी कायद्यांवर ठाम आहे तर शेतकरी देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता भाजपचे नेते भेटीसाठी येत असले, तरी आपण उपोषणावर ठाम आहोत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपोषण निश्चित करणार असून, मैदान उपलब्ध झाले नाही, तर प्रसंगी तुरुंगात उपोषण करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला आहे.
अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यसभा खासदार भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी येथे जात अण्णा हजारेंची भेट घेतली. आंदोलन करू नये, अशी विनंती अण्णांना केली आहे.
गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारशी संघर्ष सुरू आहे. एकदा दिल्लीत तर एकदा राळेगण सिद्धीत उपोषण केल्यानंतरही केंद्र सरकारने दिलेली दोन्ही लेखी आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्लीतील रामलीला किंवा जंतरमंतरवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेवटचे उपोषण सुरू करणार आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ज्या ज्या वेळी काँग्रेस सत्तेत येते त्यावेळी धर्मांतरण वाढते : आचार्य तुषार भोसले
- मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी
- इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, कुणावरही जबरदस्ती नाही- विजय वडेट्टीवार
- हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली : शेलार
- अखेर मनसे पुढे अॅमेझॉन झुकलं; मराठीचा भाषेचा लवकरच देणार पर्याय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
