Share

अण्णा सावध रहा, भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका!

Published On: 

अहमदनगर:- केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 59 दिवसांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

काल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आणि भाजपनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अण्णा हजारेंची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. फडवणीस यांच्यापूर्वी विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस, विखे-पाटील आणि अण्णांमध्ये पुन्हा एकदा दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीनंतरही आपण आंदोलनावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, काल भाजप नेते व अण्णा हजारे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर अण्णा हजारे यांच्या समर्थकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अण्णांनी भाजपच्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असा एक मतप्रवाह आहे.

कालच्या भेटीवर ॲड.असीम सरोदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अण्णा त्यांना भेटले आणि परत एकदा भाजप सोबत हजारेंची साठगाठ आहे, असे म्हणणे संयुक्तिक ठरावे अशी पार्श्वभूमी तयार झाली. अण्णांना असे राजकीय लोकांनी त्यांना भेटणे, पाया पडणे आवडते त्याला कोण काय करणार? कधी अशा राजकारण्यांना एखादी भेट नाकारणे किती ताकदवान ठरू शकते, याची अण्णांना जाणीव देणाऱ्यांचे तरी अण्णा कुठे ऐकतात?, असे सरोदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!