मुंबई : सध्या अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमी चर्चेत असते. अंकिता लोखंडे ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे. नुकताच तिने तिचा एक डान्स प्रॅक्टिसचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ खास यासाठी आहे कारण या डान्सच्या माध्यमातून अंकिताने सुशांत सिंह राजपूतला ट्रिब्यूट देणार आहे.
अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होत आहे. कारण तिने हा डान्स सुशांत साठी केला आहे. या व्हिडीओ मध्ये ती ‘तारों के शहर में’ गाण्यावर डान्स रिहर्सल करताना दिसत आहे.
तिने या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले आहे की, ‘यावेळी हे वेगळं आहे आणि परफॉर्म करणं अवघड. माझ्याकडून तुझ्यासाठी. असं आहे. अंकिता एका अवॉर्ड शोमध्ये परफॉर्म करणार आहे. ती या डान्सच्या माध्यमातून दिवंगत अभिनेता आणि तिचा पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेन्ड सुशांत सिंह राजपूत याला ट्रिब्युट देणार आहे.
https://www.instagram.com/p/CIIv1ruh6fy/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन : उदयनराजे भोसले
- ‘अजित पवारांवर लक्ष्य ठेवा असं अलीकडे सांगितलं जातंय, पण…’
- ‘लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतल्या आहेत’ – पृथ्वीराज चव्हाण
- ‘संजय राऊतांच्या नातेवाईकांना देखील ईडीच्या नोटीसा’; नितेश राणेंचा दावा
- बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी तब्बल सतरा पथके स्थापन


