मुंबई : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. २००८ नंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. नीरजनं हे मेडल महान धावपटू मिल्खा सिंग यांना अर्पण केले आहे.
‘मी माझे हे सुवर्णपदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. कदाचित ते मला स्वर्गातून बघत असतील. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मला माहीत होते, की आज मी माझे सर्वोत्तम काम करेन. मला ऑलिम्पिक स्पर्धेचा विक्रम मोडायचा होता.’, अशी प्रतिक्रिया ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या भालाफेकपटून निरज चोप्रा यांनी दिली.
What a show @Neeraj_chopra1! Dad waited so many years for this to happen. His dream has finally come true with India's first athletic gold.
I am crying as I tweet this. And I am sure dad is crying up above.
Thank you for making this happen.#Olympicsindia #Cheers4India
— Jeev Milkha Singh (@JeevMilkhaSingh) August 7, 2021
नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर मिल्खा सिंग यांचा मुलगा जीव मिल्खा सिंह याने ट्विट करत म्हणटले की, खूप जबरदस्त कामगिरी नीरज चोप्रा. बाबांना या क्षणाची कित्येक वर्षांपासून प्रतीक्षा होती. भारताला एथलेटिक्समध्ये गोल्ड मेडल मिळावं हे त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. मी सध्या रडत आहे. मला खात्री आहे की वर बाबा देखील रडत असतील. या कामगिरीबद्दल खूप आाभार, असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोड्याश्या फरकानं ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात पदक जिंकावे अशी त्यांची शेवटची इच्छा होती आणि ती नीरजनं पूर्ण केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ख्वाहिश आपको सोने ना दे’ ; नीरज चोप्रानं ४ वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट होतयं व्हायरल
- ‘मोदींना भाजप विचारसरणीचे न्यायाधीश पाहिजे’, पी.चिदंबरम यांची टीका
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई
- पहिली कसोटी निर्णायक टप्प्यात, विजयासाठी भारताला हव्या १५७ धावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

