Share

Deepak Kesarkar | ठाकरे अन् शिंदे गट येणार एकत्र?, दीपक केसरकर म्हणाले…

Published On: 

Deepak Kesarkar | मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात दोन गट पडले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट, असे दोन गट पडले. त्यामुळे हे दोन कधी एकत्र येतील का असा सवाल जनतेला आहे. याबाबत दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवी मुंबईतील एका कार्यक्रमात प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर यांनी केलेल्या विधनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

यादरम्यान, दोन्ही गट एकत्र येणार की नाही हे मी सांगू शकत नाही. मात्र दोन्ही गट एकत्र यावे ही राज्याच्या जनतेची इच्छा असल्याचं दीपक केसरकर म्हणाले. तसेच अमोल किर्तीकर लवकरच बाळासाहेबांच्या विचारासोबत येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे षड्यंत्र ओळखून सर्व शिवसैनिक बाहेर पडून बाळासाहेबांच्या विचारासोबत येतील, असं भाकीत दीपक केसरकर यांनी केलं आहे. तसेच नवी मुंबईत लवकरच मराठी भाषा भवन उभे राहणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं आहे.

दीपक केसरकर यांच्या अमोल कीर्तीकर यांच्याबाबत केलेल्या दाव्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार का? असा प्रश्न चर्चेत येत आहे. एकनाथ शिंदे हे वारंवार उद्धव ठाकरे यांना धक्के देतच आहेत. रविवारीच ठाकरे गटाच्या आणखी एका आमदाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!