मुंबई : ‘महाविकास आघाडी सरकार एक वर्षपूर्ती सोहळा साजरा करत आहे. राज्यातील ठाकरे सरकारला वर्षपूर्ती झाली. पण जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. हे ठाकरे सरकार कामात शून्य आहे, असं सांगतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला. हा त्यांचा पायगुण आहे,’ अशी जळजळीत टीका भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी केली.
गेल्या वर्षभरात महाराष्ट्राचा कोणत्याच क्षेत्रात अव्वल नंबर आला नाही. इतकी महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. पण कोरोनामुळे एकट्या महाराष्ट्रात 50 हजार लोकांचा मृत्यू झाला. इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना मृत्यूंची महाराष्ट्रातील संख्या सर्वाधिक आहे. इतर कशात नाही, पण कोरोना बळी आणि कोरोनाच्या वाढत्या संख्येत महाराष्ट्र नंबर वन झाला आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती.
राणेंच्या या टीकेला शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.’राज्य सरकारला राणेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही. सरकारने वर्षभर काम केलंय, म्हणून विरोधक निराश आहेत,’ असं म्हणत त्यांनी राणेंना टोला लगावला आहे. ‘ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना सुरुवातीलाच कर्जमाफी दिली. कोरोनात जगाची दैना झाली आहे. ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. विरोधकांना विरोध करण्याशिवाय पाच वर्ष काम नाही,’ असं प्रत्युत्तर देखील अनिल परब यांनी सरकार पडणार असं भाकीत वर्तवणाऱ्या भाजप नेत्यांना दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेतृत्व कुठल्याही पक्षाच्या हातात देणार नाही : पाटील
- सावरपाडा एक्सप्रेस, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतची नोकरीसाठी राज्यपालांकडे धाव…
- धावत्या कारमध्ये थरार; मध्यप्रदेश मध्ये काँग्रेस आमदारावर प्राणघातक हल्ला !
- ऑनलाइन खरेदीवर मिळणाऱ्या ‘कॅश बॅक’विरोधी अ. भा. व्यापारी महासंघाची तक्रार…
- शिवसेनेतर्फे लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन; स्पर्धेवरून भाजप-शिवसेनेत वादंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

