🕒 1 min read
मुंबई : गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एसटी कामगारांना पगारवाढ करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र तरीही एसटी कामगार आंदोलन सुरूच ठेवत आहेत. एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पगारवाढ केल्यानंतर आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी या आंदोलनातून माघार घेतल्यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व अड. गुणरत्न सदावर्ते यांनी घेतले आहे. त्यांनी आंदोलकांच्या ठाम भूमिकेला पाठिंबा दिला आहे. संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी गंभीर इशारा दिला आहे.
काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तर काही एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे हट्ट करून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याकडून देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातले एसटी कर्मचारी राज्यव्यापी संपावर होते. हा संप 15 दिवस चालल्यानंतर राज्य सरकारनं ऐतिकासिक 41 टक्के पगारवाढ जाहीर केली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी हट्ट न करता कामावर हजर व्हावं, असं आवाहन अनिल परबांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांना दिलेलं अल्टीमेटम आज संपणार
- जे वकील भडकवताय, ते कामगारांचं कुटुंब जगवायला येणार नाहीत; राऊतांचा सदावर्तेंना टोला
- फडणवीस-चंद्रकांत पाटलांची वरिष्ठांसोबत बैठक; पक्ष कार्यालयात पुन्हा खलबतं
- भावना गवळींना ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर ईडी कार्यालयात हजर राहणार?
- या देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जातं; संजय राऊत यांनी व्यक्त केली खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
